---Advertisement---

नंदुरबारमध्ये इमाम बादशहाच्या उरूसला जाणाऱ्या टवाळखोर मुस्लिम तरुणांची रेल्वे प्रवाशांमध्ये दहशत

---Advertisement---

नंदुरबारमध्ये इमाम बादशहाच्या उरूसला जाणाऱ्या टवाळखोर मुस्लिम तरुणांनी रेल्वे प्रवाशांना त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे. सुरत पॅसेंजरमध्ये तरुणांनी १९ ते २० वेळा चैन पुलिंग केली, पण रेल्वे पोलिसांत एकावरच चैन पुलिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नंदुरबार येथे इमाम बादशहाचा उरूस भरत असतो. त्याच्या दर्शनासाठी उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील सुरत येथून बरेच मुस्लिम नागरिक व तरुण दर्शनासाठी येत असतात. हा उरूस तीन दिवस असत्यामुळे येथे इमाम बादशहा यांची यात्रा भरत असते. यावेळेस ७जुलैपासून सुरू झालेल्या या यात्रेला मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत.

उधना ते भुसावळ पॅसेंजर नंदुरबार येथे ७जुलेला रात्री ९ वाजता रेल्वे स्टेशनवर आली. तेथून ती भुसावळकडे जाण्यासाठी खाना झाली. त्या गाडीत बसलेल्या मुस्लीम प्रवाशांनी गाडीत असलेल्या हिंदू प्रवाशांना धक्काबुक्की करून मारहाण केली. प्रवाशांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे काही प्रवाशांनी रेल्वे गाडीची चैन पुलिंग करून गाडी थांबवली. त्यामुळे जी गाडी अमळनेर येथे रात्री ११ वाजता पोहोचते ती गाडी तब्बल दोन तास उशिरा पोहोचली. ऊरूस मोहरम या सणात मुस्लिम प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हिंदू प्रवाशांना मारहाण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसल्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.

८ जुलै रोजी सकाळी सुरतवरून येणाऱ्या दोन रेल्वेंना नंदुरबार व जळगाव येथेच थांबा आहे. तरीही नरडाणा येथे एका मुस्लिम तरुणाने रेल्वेगाडीची चैन पुलिंग केली. याच रेल्वेमध्ये अमळनेरचे ४० ते ५०, धरणगाव व जळगावचे १०० टारगट तरुण गाडीत बसलेले आहेत व ते इतर प्रवाशांना त्रास देत असल्याची तक्रार आरपीएफकडे आली होती.

ही घटना अमळनेर आर. पी.एफ.ला समजली. त्यावेळी त्यांनी अमळनेर येथील काही स्वयंसेवकांना मदतीसाठी पाचारण केले. अमळनेरच्या स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली. या घडलेल्या प्रकारावर अमळनेर रेल्वे पोलिसांनी कोणतीही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षदर्शीनी झालेला प्रकार सांगितला.

त्यात हिंदू महिलांची छेड काढणे, मोबाईल हिसकावणे व शिवीगाळ करणे असा प्रकार गाडीत सर्रास घडलेला असतानासुद्धा रेल्वे प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गतवर्षी धार येथील उरस वेळी रेल्वे चैन पुलिंग, रेल्वेवर झालेली दगडफेक, महिलांसमोर अश्लील वर्तणूक, हिंदू धर्माला नावे ठेवणे व जिहादी वृत्ती यावर आवर घालत ज्या स्वयंसेवकांनी मदत केली. त्यांच्या संघटनेला नाव ठेवताना रेल्वे पोलिस दिसत होते. प्रत्यक्षदर्शीनुसार, रेल्वेत धरणगाव, जळगाव व अमळनेर येथील मुस्लिम तरुणांची संख्या खूप असल्याने ते महिलांना व हिंदू नागरिकांना त्रास देताना दिसले.

  • अमळनेर रेल्वेचे सहायक फौजदार चव्हाण यांनी एक तासानंतर माहितीची प्रत देतो, असे सांगितले. टाळाटाळ करत असा कोणताही प्रकार झालेला नाही असे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---