उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त वाहिली श्रद्धांजली…!

---Advertisement---

 

महाराष्ट्राच्या राजकारणावर खोलवर छाप उमटवणारे नेते अजित पवार यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की,
“श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत ते सदैव अग्रभागी राहणारे मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा मोठा आदर होता. प्रशासकीय बाबींचे त्यांना सखोल ज्ञान होते. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे.”

पंतप्रधानांनी पुढे अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करत “ॐ शांती” अशी श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व पक्षांतील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---