---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून झाली होती, अशी चर्चा सुरू होती. आणि गोजुबावी गावच्या नागरिकांनी देखील सांगितलं. मात्र, CID तपासात ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विमान अपघातप्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आल्यानंतर CID चे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अजितदादांच्या घड्याळावरून ओळख झाली नव्हती- CID
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आता CID करत आहे आणि तपासादरम्यान CID ला असं आढळून आलं की अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून झालेली नव्हती. प्रत्यक्षात घटनास्थळी कोणतंही घड्याळ सापडलेलं नव्हतं, अशी माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली आहे.
अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?
पोलीस सूत्रांच्या प्राथमिक माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृतदेहाची प्राथमिक ओळख त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विशिष्ट कापडाच्या डिझाइनवरून पटली. त्या कपड्याचा नमुना आणि डिझाइन इतर कपड्यांपेक्षा वेगळा होता, ज्यामुळे पोलिसांना मृतदेह अजित पवार यांचाच असल्याची खात्री झाली. तसेच, डाव्या हातावर दिसणारा घड्याळासारखा भाग हा प्रत्यक्षात घड्याळ नसून कपड्याचाच एक भाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं.
पोलिसांनी DNA अहवालानंतरच अंतिम ओळख केली स्पष्ट :
पोलिसांनी तपस करत असताना सर्व मृतदेहांची प्राथमिक ओळख कपड्यांच्या आधारे केली असली, तरी कोणतीही चूक होऊ नये म्हणून DNA चाचणी करण्यात आली. DNA अहवाल आल्यानंतरच मृतदेहांची अधिकृत ओळख निश्चित करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संपूर्ण प्रकरणात सर्व शास्त्रीय, कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आल्या आहेत. CID चा पुढील तपास सुरू असून, अपघातामागील प्रत्येक पैलू तपासला जात असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.









