अजित दादांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत; श्रीनिवास पवारांनी नेमकं काय सांगितलं ?

---Advertisement---

 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे पुढील कोणतेही धार्मिक किंवा सार्वजनिक विधी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिली आहे.

28 जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अजित दादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर 30 जानेवारी रोजी अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्याच दिवशी सोनगाव येथील कऱ्हा-नीरा संगमावर अस्थी विसर्जन करण्यात आले. याच वेळी आवश्यक ते सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनुसार होणारा दहावा किंवा तेरावा दिवसाचा कोणताही विधी आयोजित केला जाणार नाही. दशक्रिया विधी देखील तिसऱ्याच दिवशी पूर्ण करण्यात आल्याने आता पुढे कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाबाबत पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच माहिती देण्यात आल्याचेही श्रीनिवास पवार यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, आज बारामतीतील काटेवाडी येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी सांत्वनपर भेटींचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पवार कुटुंबीय नागरिक, कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटी स्वीकारणार आहेत. सकाळपासूनच येथे भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---