---Advertisement---
जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना असून अजिंठा रोडवरील काशिनाथ चौक भागातून चोरी झालेल्या मोटार सायकलीसह दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. यात जळगाव शहरातील कांचन नगरातील आतिष जितेंद्र पोथीवाल आणि भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील गणेश लक्ष्मण कोळी या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील अजिंठा रोडवरील काशिनाथ चौक भागातून चोरी मोटार सायकल झालेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या मदतीने दोघा चोरट्यांची नावे निष्पन्न करण्यात आली. या दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु असून त्यांच्याकडून चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघा चोरट्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, पो. हे.कॉ. गिरीश पाटील, पो.ना.प्रदिप चौधरी, पो.कॉ. गणेश ठाकरे, पो.कॉ. राहुल घेटे, पो.कॉ. योगेश घुगे आदींनी या मोटारसायकल चोरीच्या घटनेचा तपास केला आहे. अधिक तपास पो.ना.प्रदिप चौधरी, पो.कॉ. योगेश घुगे करत आहेत.









