---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील शेवगे आणि मुंदाने परिसरातील शेतशिवारात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या सौर उर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या मोटारी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. 30 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान या मोटार चोरी झाल्याचं उघडकीस आलं असून याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील शेवगे आणि मुंदाणे शेत शिवारात प्रवीण सजन पाटील वय 40 राहणार शेवगे यांच्या शेतातील चोरट्यांनी 12 हजार रुपये किमतीची इकोझेन कंपनीची मोटार आणि वायर ही चोरून नेली. यासह त्यांच्याच शेजारील शेतकरी शेख शरीफ शेख यासीन यांची दहा हजार रुपये किमतीची रोटोसोल कंपनीची मोटार तसेच दिनकर कौतिक पाटील यांची 12 हजार रुपयांची क्रॉम्प्टन कंपनीची व 4 हजार रुपयांची मेगा कंपनीची मोटार यासह सिंधुबाई हरी पाटोळे यांची 12000 रुपयांची मोटार असा एकूण पन्नास हजार रुपये किमतीच्या मोटारी व वायरी या अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक निलेश साळुंखे हे करत आहेत.









