धक्कादायक : श्री क्षेत्र पद्मालय वनक्षेत्रात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र पद्मालय मंदिर परसरातील वनक्षेत्रात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. असून या घटनेने संपूर्ण एरंडोल तालुक्यात व परिसरात खळबळ उडाली आहे. यासह भीतीच वातावरण पसरल आहे. प्राथमिक माहितीनुसार हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीक्षेत्र पद्मालय परिसरातील वनक्षेत्रात तेथील स्थानिक नागरिकांना जंगलात 4 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयास्पद अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह दिसून आला. सदर मृत महिलेचा मृतदेह हा कंबर पासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळून आला त्यामुळे त्याची ओळख पटवणे हे शक्य झालं नाही याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क केला.

सदर घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पद्मालय परिसरातील वनक्षेत्रात घटनास्थळी दाखल झालं त्यानंतर घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली व त्या ठिकाणी त्यांना बियरची बॉटल आढळून आली त्यामुळे हत्या करणाऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत हा गुन्हा केला असावा किंवा सदर महिलेस  गुंगीच औषध देऊन तिची हत्या केली असावी. असा संशय हा व्यक्त केला जात असून प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या गेल्या दोन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदर घटनास्थळावर जे पुरावे सापडले आहेत त्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं असून पंचनाम्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेबाबतचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचं सध्या पोलिसांनी प्राथमिक माहितीनुसार सांगितल आहे. दरम्यान एरंडोल पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून जळगाव जिल्ह्यातील बेपत्ता महिलांच्या नोंदीवरून ओळख पटवण्याचे काम हे सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण घटनेमुळे श्रीक्षेत्र पद्मालय परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---