---Advertisement---
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात तब्बल 6 हजार 800 रुपयांची घसरण तर चांदीच्या भावात तब्बल 35 हजार रुपयांची घसरण झाली आहे. काल सोन्या-चांदीच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र 24 तासानंतर सोन्या व चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आज सोन्याचे भाव हे 6 हजार 800 रुपयांनी वाढून सोन्याचे भाव जीएसटी विना 1 लाख 52 हजार रुपयांवर आहेत तर जीएसटीसह सोन्याचे भाव हे 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर घसरले आहेत. यासह चांदी ही 35 हजार रुपयांनी घसरून जीएसटी विना 2 लाख 55 हजार रुपयांवर तर जीएसटी सह चांदीचे भाव हे 2 लाख 62 हजार 650 रुपयांवर घसरले आहेत. जागतिक अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याची माहिती सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे.
काल सोन्याचे दर हे जीएसटी विना 1 लाख 60 हजार रुपये होते तर जीएसटी सह सोन्याचे भाव 1 लाख 64 हजार 800 रुपये होते. यासह चांदीचे दर हे जीएसटी विना 2 लाख 90 हजार रुपये होते. तर जीएसटी सह चांदीचे दर हे 2 लाख 98 हजार 700 रुपये इतके होते. मात्र आज सोन्या व चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.









