रावेर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर…

---Advertisement---

 

ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने रावेर तालुक्यात भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून निवड झालेल्या तब्बल ५० गरजू रुग्णांवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. रावेर परिसरातील गोरगरीब रुग्णांना ने आण करण्याचा खर्च आणि प्रवासाची सोय व इतर खर्च हा आमदार अमोल जावळे यांच्या स्वखर्चाने त्यांनी केला असून ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येऊन उपचार घेणे हे परवडणार नाही म्हणून त्यांनी ही बाब लक्षात घेऊन ही आरोग्य सेवा आमदार अमोल जावळे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनुभवी नेत्रतज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून शस्त्रक्रिया ही यशस्वी पार पाडली. वैद्यकीय पथकासह परिचारिका व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शोभा घोणशीकर, डॉ. मयुरी राठोड, डॉ. मयुरेश डोंगरे, डॉ. स्वाती असोले, डॉ. सोफिया अन्सारी, डॉ. अनंत लांडगे तसेच डॉ. तुषार जोशी, डॉ. कल्पेश पाटील यांनी आपली सेवा दिली. या मोहिमेत वृंदा कुंभारे, सुनीता वक्ते, डॉ. भाग्यश्री ढाकणे, डॉ. हिरा पालवे, डॉ. मयुरी हिवर्दे, डॉ. वैष्णवी दांडगे, उमेश वेल्हाळ आणि स्वप्नील पाटील या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या शिबिराचे आयोजन व नियोजन आणि समन्वय मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांनी केले. डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी वैद्यकीय पथकाला मार्गदर्शन केले. या कार्यात शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील, आ. जावळे यांचे संदीप महाजन, बाळा आमोदकर, कुणाल सोनवणे आणि चेतन भिरुड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी ही रुग्णांच्या सोयीसाठी मोलाची भूमिका बजावली. आमदार अमोल जावळे यांच्या या उपक्रमामुळे ५० वृद्धांना पुन्हा दृष्टी लाभली असून आमदार अमोल जावळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---