सार्वजनिक बांधकाममधील भ्रष्टाचारप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा; मुविकोराज कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…!

---Advertisement---

 

सार्वजनिक बांधकाम विभाग, येथील भ्रष्टाचार प्रकरणी अभियंता योगेश अहिरे यांच्यासोबत अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे मुविकोराज कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.

मुविकोराज कोल्हे यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची गंभीर बाब मागील काही दिवसात निदर्शनास आली आहे. या विभागातील सर्व अधिकारी शासकीय कामकाजामध्ये जाणूनबुजून अडथळे निर्माण करून संबंधित कामे मंजूर करण्यासाठी तसेच फाईल पुढे सरकविण्यासाठी बेकायदेशीर आर्थिक मागणी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेषतः अभियंता योगेश अहिरे यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी असून ते पंधरा लाखाच्या लाचखोरीमध्ये सुद्धा त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यासोबत या प्रकरणात अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांची भूमिकाही संशयास्पद असल्याने त्यांची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक, कंत्राटदार व संबंधित कामधारकांना मानसिक, आर्थिक व प्रशासकीय त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारा असून शासकीय पदाचा गैरवापर करून भ्रष्ट पद्धतीने कामकाज चालविले जात असल्याचा संशय आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच मध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या 54 वर्षीय शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ए.सी.बीच्या विशेष पथकाने अत्यंत शिताफीने रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. एका ठेकेदाराकडून रस्त्यांचे बिल पास करण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मोठी लाच स्वीकारताना त्यांना त्यांच्याच कार्यालयाबाहेरील कारमध्ये पकडण्यात आले. लाच स्वीकारण्याची पद्धतही या अधिकाऱ्याने अत्यंत हुशारीने ठरवली होती. कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन सीटखाली ही ठरलेली रक्कम ठेवण्यास ठेकेदाराला सांगण्यात आले होते. परंतु तक्रारदाराने आधीच ए.सी.बीला संपूर्ण माहिती दिली असल्याने अधिकाऱ्यांचा पक्का सापळा तयार होता. ठरल्याप्रमाणे ठेकेदाराने गाडीत पैसे ठेवताच आजूबाजूला दबा धरून बसलेल्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता धडक कारवाई केली आणि लाचखोर अधिकाऱ्याला पैशांसह जागीच ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. कारण या अधिकाऱ्याकडे संपूर्ण जळगाव शहरातील तब्बल 186 कोटी रुपयांच्या सिमेंट व समांतर रस्त्यांच्या कामांची मुख्य जबाबदारी होती. एक अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला फक्त स्थापत्य सहाय्यक म्हणून काम करणारे हे महाशय अवघ्या चार ते पाच वर्षांपूर्वीच पदोन्नती मिळवून शाखा अभियंता झाले होते.

तरी सदर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून अभियंता योगेश अहिरे तसेच अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी मुविकोराज कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---