भयंकर: धरणगाव चोपडा रोडवरील भंगार गोडाऊनला भीषण आग, मोठं आर्थिक नुकसान…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून काही वेळातच तिने विक्राळ रूप धारण केले.

आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट पसरले होते, तर आगीचे लोळ उसळत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष बाब म्हणजे या गोडाऊनच्या शेजारीच महावितरणचे 132 केव्ही क्षमतेचे सब स्टेशन असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सुदैवाने आग त्या दिशेने पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच धरणगावसह अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानाचे प्रमाण याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---