जळगावच्या विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याचे योग शिबिर उत्साहात; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना

---Advertisement---

 

जळगाव : विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जळगाव येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याच्या योग शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, मन शांत राहते आणि एकाग्रता सुधारते, यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो.

या योग शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील एम.ए. योगशास्त्र शाखेच्या विद्यार्थिनी मयुरी खाबिया यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जात आहे.

या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य सतीषकुमार मालाकर आणि अश्विनी पाठक मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच विद्यापीठाचे प्रा. राजेश पाटील, डॉ. लिना चौधरी, डॉ. गीतांजली मंगाळे आणि लिंता चौधरी यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.

या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढत असून त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा होत असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---