जळगाव जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ; दिवस उकाडा रात्री गारवा, तापमान पोहोचले ३५ अंशांवर….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाती पासून उन्हाळ्याची चाहूल लागली होती, मात्र आता फेब्रुवारी महिना अर्ध्यवार येताच जळगाव जिल्ह्यात थंडी  जवळपास संपुष्टात आली असून दुपारच्या वेळेत तापमानात वाढ झाली असुंन उन्हाचा चटका वाढू लागला आहे. सकाळच्या वेळी हलकी गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र तापमानात झपाट्याने वाढ होत असून उकाडा जाणवत आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे . त्यासह कमाल तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. मात्र या बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे.

सध्या जळगाव जिल्ह्याच्या किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात काल मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होत. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवला आणि रात्री गारवा जाणवला. जळगाव जिल्ह्यात काल कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंद झाली. मात्र आजपासून तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दि. १८ फेब्रुवारीपासून किमान तापमानाचा पारा घसरणार असून दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हा पारा १३ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या थंडीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. मात्र दिवसा ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरण निर्माण होणार आहे. या बदलत्या दुहेरी स्थितीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जानेवारी-फेब्रुवारीत सुमारे १८ दिवस राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, गहू, कांदा आणि केळी यांसारख्या रब्बी पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. सकाळी कडाक्याची थंडी आणि दुपारी उकाडा अशा वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली. केळी पिकाला या हवामानाचा मोठा फटका बसला. ढगाळ हवामानामुळे पिकांवर औषध फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी वर्गाचा उत्पादन खर्च वाढला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---