जळगाव शहरात रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप कार्यक्रम; 173 विद्यार्थी व 30 शिक्षकांना बक्षिसे

---Advertisement---

 

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा समारोप दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 5.30 वाजता करण्यात आला. या अभियानाअंतर्गत शहरातील 35 शाळांमध्ये रस्ता सुरक्षा विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
तसेच बस डेपो, कॉलेज परिसर व विविध चौकांमध्ये जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. हेल्मेट वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
समारोप कार्यक्रमाला जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानपुरे व पोलीस उपअधीक्षक अरुण अल्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धांमध्ये निवड झालेल्या 173 विद्यार्थ्यांना व 30 शिक्षकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शहरातील विविध संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रस्ता सुरक्षा अभियानामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---