---Advertisement---
जळगाव येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक ऊर्जा वाढते तसेच मानसिक शांतता मिळते, यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी च्या एम.ए. योगशास्त्र विभागातील विद्यार्थिनी मयुरी खाबिया यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विविध योगासनांचे प्रात्यक्षिक, प्राणायाम आणि ध्यानसाधना यांचा समावेश शिबिरात करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य सतीषकुमार मालाकर व अश्विनी पाठक मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विद्यापीठाचे प्रा. राजेश पाटील, डॉ. लिना चौधरी, डॉ. गीतांजली मंगाळे आणि लिंता चौधरी यांचेही मार्गदर्शन मिळत आहे.









