जळगाव जिल्ह्यात प्रशासक नियुक्ती विरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आंदोलन

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अखिलेश भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
आज दिवसभरासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवत या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. सरपंच परिषदेकडून प्रशासक नियुक्त न करता गावचा कारभार विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडेच कायम ठेवावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना जिल्हाभरातील विविध गावांतील सरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, शासनाने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---