अल्पवयीन मुलीला दिला फ्लाईंग किस, ९ वर्षांपूर्वीची एक चूक पडली महागात, आणि आता न्यायालयाने……

---Advertisement---

 

मुंबईतील एका नऊ वर्षे जुन्या छेडछाडीच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मध्ये घडलेल्या या घटनेत, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान १६ वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. न्यायालयाने आरोपीवर ३,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

घटनेच्या वेळी आरोपी १९ वर्षांचा असून तो पीडितेचा शेजारी येऊन कार्यक्रमादरम्यान त्याने मुलीचा हात धरून तिला मागे ओढल्याचे आणि समज दिल्यानंतरही तिच्याकडे फ्लाईंग किस केल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. या प्रकारामुळे मुलगी हादरली होती. तिने भीतीपोटी ही बाब कुटुंबीयांना सांगितली, त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

तपासात असेही समोर आले की, या घटनेपूर्वी आरोपीकडून मुलीचा वारंवार पाठलाग केला जात होता. ती शिकवणीला जात असताना तो तिच्या मागे जायचा, तिचा हात पकडण्याचा आणि तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करायचा, अशी माहिती पीडितेने दिली होती. त्यामुळे ती आधीपासूनच दडपणाखाली होती. कार्यक्रमातील प्रकारानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. मुलीच्या कुटुंबाने आरोप केल्यानंतर आरोपीच्या पालकांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे नोंदवले गेले.

न्यायालयात बचाव पक्षाने दावा केला की, आरोपीने नाचताना केवळ इशाऱ्याने फ्लाईंग किस केला होता आणि त्यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता. मात्र, पीडित पक्षाच्या बाजूने मांडण्यात आलेल्या युक्तिवादावर विश्वास ठेवत न्यायालयाने ही कृती लैंगिक छळाच्या स्वरूपाची असल्याचे नमूद केले. दीर्घ सुनावणीनंतर अखेर आरोपी दोषी ठरला आणि त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---