सहा वर्षीय बालिकेचा विषारी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू: पिंपळगाव बुद्रुक परिसरात शोककळा…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक गावात सहा वर्षीय बालिकेचा विषारी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत बालिकेचे नाव हे आलिया फिरोज तडवी असे आहे. विषारी सापाने दंश केल्यानंतर कुटुंबीयांनी अथक प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न व्यर्थ ठरले.

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या गावात तडवी कुटुंब हे नदीकाठी वास्तव्यास आहे. नदीकाठच्या परिसरात फिरोज तडवी हे त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासह वास्तव्य करतात. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तीनही भावंड हे खेळत असताना आलिया तडवी या सहा वर्षीय बालिकेला विषारी सर्पाने दंश केले, सदर बालिकेने सर्पदंश झाल्यानंतर किंचाळी मारली आणि साप चावल्याचं तिच्या वडिलांना सांगितलं त्यावेळेस बालिकेचे वडील फिरोज तडवी यांनी परिसरात सापाचा शोध घेतला मात्र साप कुठेही आढळून आला नाही.

दरम्यान फिरोज तडवी यांनी वेळ वाया न घालवता बालिकेला तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. मात्र जळगाव येथे उपचारासाठी घेऊन जात असतानाच आलिया तडवी या सहा वर्षीय बालिकेची प्राणज्योत मालवली. जळगाव येथे दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासले आणि मृत्यू घोषित केले. या संपूर्ण घटनेमुळे पिंपळगाव बुद्रुक परिसरात शोककळा पसरली असून पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---