शिवशाही बस बंद होणार? शिवशाही बस बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या शिवशाही बस बाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शिवशाही बस मध्ये सातत्याने होणारे बिघाड यासह शिवशाही बसला प्रवाशांचा मिळालेला कमी प्रतिसाद पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीच्या असलेल्या 453 शिवशाही बसेस आता निम आराम आणि साध्या बस मध्ये रूपांतरित होणार आहेत त्यामुळे शिवशाही बस आता नव्या आणि साध्या अवतारातच रस्त्यावर धावणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात सद्यस्थितीत स्वमालकीच्या एकूण 688 शिवशाही बसेस ह्या आहेत आणि यापैकी 453 बसेस सध्या उत्तम प्रकारे धावत आहेत. मात्र धावत असलेल्या या 453 बसेसचे आयुष्य हे दहा वर्षांपेक्षा जास्त नसल्याने शासनाने हा निर्णय घेतल्याच समोर आला आहे. वारंवार तांत्रिक बिघाड तसेच वातानुकूलित यंत्रणेतील तक्रारी यामुळे शिवशाही बसेस रूपांतर करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे. वारंवार होत असलेले तांत्रिक बिघाड त्यामुळे प्रवाशांनी शिवशाही बस कडे पाठ फिरवलेली होती. आणि म्हणून शिवशाही बस या साध्या रूपात आता प्रवाशांसाठी सेवेत येणार आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामागे आर्थिक आणि प्रशासकीय गणितही महत्त्वाचे मानले जात आहे. वातानुकूलित सेवेसाठी लागणारा वाढता देखभाल खर्च, सुटे भागांची उपलब्धता, इंधन वापरातील वाढ आणि कमी होत गेलेली प्रवासी संख्या यामुळे शिवशाही सेवेचा ताळमेळ बिघडत होता. अनेक मार्गांवर एसी सुविधा असूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता, तर दुसरीकडे ग्रामीण आणि मध्यम अंतराच्या मार्गांवर साध्या व निमआराम बसांची मागणी वाढत होती. परिणामी उपलब्ध साधनसंपत्तीचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी या बसांचे रूपांतर करण्याचा पर्याय निवडण्यात आला. या बदलामुळे ताफ्याची देखभाल सुलभ होईल, खर्चात बचत होईल आणि अधिक मार्गांवर नियमित सेवा देणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. प्रवाशांना किफायतशीर भाड्यात स्थिर आणि विश्वासार्ह सेवा देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---