कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; केंद्र शासनाकडुन कापूस खरेदीस मुदत वाढ….!

---Advertisement---

 

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र शासनाने कापूस खरेदीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे हमीभावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त कालावधी उपलब्ध होणार आहे. ही माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

कापूस खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. त्यानुसार संबंधित विभागांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला. सकारात्मक विचार करून केंद्र शासनाने खरेदीची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही हमीभावाने खरेदी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. हरभऱ्यासाठी प्रती क्विंटल ५,८७५ रुपये इतका हमीभाव निश्चित करण्यात आला असून नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील कापूस व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---