---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद शहरातील पेठ परिसरात अज्ञातांकडून दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.
नशिराबाद शहरातील पेठ भागात रहिवासी असलेले सिताराम बुधा नाथ यांच्या मालकीची दुचाकी दिनांक 9 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती ही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे मात्र अद्यापही दुचाकी जाळणारा आरोपी हा मिळून आलेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. अशा दुचाकी जावयाच्या या घटनांमुळे शहरातील वाहनधारकांचे आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे जाऊन तक्रार केली व नशिराबाद शहरात रात्रीच्या गोष्टीची व्यवस्था मजबूत करण्याची मागणी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा सध्या नशिराबाद शहरातील नागरिक हे व्यक्त करत आहेत.









