---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पारंपरिक पतसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या पतसंचलनामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून पतसंचलन काढले. पारंपरिक पोशाखात आणि देशभक्तीपर वातावरणात हे संचलन पार पडले, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंत्री गिरीश महाजन हे राजकीय कामकाजात व्यस्त असतानाही दरवर्षी या पतसंचलनामध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळते. यंदाही त्यांनी संघाच्या पोशाखात सहभागी होत परंपरा कायम ठेवली.
जामनेर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या पतसंचलनात मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक सहभागी झाले होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे शहरात सणासुदीचे आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले.









