भोकर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न

---Advertisement---

 

जळगाव तालुक्यातील भोकर येथे दिनांक २२ मार्च २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भोकर येथे पार पडलेल्या या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या शिबिरामध्ये कांताई नेत्र संजीवनी योजना अंतर्गत २०० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. उपस्थित रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून, मोतिबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची जळगाव येथील कांताई नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.


मागील पाच वर्षांपासून भाऊसाहेब सोनवणे यांच्या पुढाकारातून पंचक्रोशीतील गरजूंसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, हजारो रुग्णांना याचा लाभ झाला आहे.


या उपक्रमाचे आयोजक प्रा. भाऊसाहेब सुकदेव सोनवणे (उप जिल्हाप्रमुख, जळगाव जिल्हा, शिवसेना उ.बा.ठा.) यांनी नागरिकांना भविष्यात कोणत्याही आजारासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


शिबिर यशस्वी करण्यासाठी अशोक पाटील, प्रभाकर कोळी, नंदलाल सोनवणे, दिलीप बाविस्कर, हरीश पवार, दिलीप पवार, किशोर पवार, लोटन सोनवणे, संदीप पाटील, सुकदेव बाविस्कर, योगेश कोळी, धनराज वारडे, समाधान वाघ, विलास सोनवणे, एकनाथ सैंदाने आणि विशाल सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---