ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचा उपक्रम, २८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

---Advertisement---

 

जळगाव : संकट काळात सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी धावून जाणाऱ्या ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक कौतुकास्पद कार्य पार पडले आहे. जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील एकूण २८ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नियोजनातून या तिन्ही तालुक्यातील गरजू रुग्णांना एकत्रित करण्यात आले होते. या रुग्णांची तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे आणण्यात आले.

रुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडल्या. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. स्वाती असोले, डॉ. सोफिया अन्सारी या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. त्यांना परिचारिका सुनीता वक्ते, अधिपरिचारिका मयुरी हिवर्डे, लालसिंग पावरा आणि उमेश वेल्हाळ यांनी सहकार्य केले. या संपूर्ण मोहिमेत ग्रामीण भागातील नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पहूर (ता. जामनेर) ग्रामीण रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी विलास बाविस्कर आणि बोदवड-मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी पी. बी. खेवलकर यांनी रुग्णांची निवड आणि प्राथमिक तपासणीत सक्रिय सहभाग नोंदवला.

“गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत हाच ना. गिरीश महाजन यांचा मानस आहे. या शस्त्रक्रियेमुळे २८ रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा नवा प्रकाश आला आहे.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---