रविवारी गोलाणी मार्केटमध्ये विशेष महास्वच्छता मोहीम

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये येत्या रविवारी सकाळी ७वाजेपासून मनपा व बीव्हीजीकडून भव्य स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत संपूर्ण मार्केट परिसर १०० टक्के चकाचक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत कार्यालयीन आदेश निर्गमित केले आहेत.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी गोलाणी मार्केटची चार विंगमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक विंगसाठी स्वतंत्र आरोग्य निरीक्षक, युनिट प्रमुख आणि मोकादम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्केटमधील अंतर्गत रस्ते, विंग निहाय गल्ल्या आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. कामाचे स्वरूप आणि प्रगती तपासण्यासाठी जीपीएस फोटोसह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे कर्मचारी या कामात हलगर्जीपणा करतील किंवा विनापरवाना गैरहजर राहतील, त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षकांनी संपूर्ण परिसर १०० टक्के साफ झाल्याचे खात्री करून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---