जळगाव मनपात १५२५ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजूरी

---Advertisement---

 

जळगाव : महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्थायी समितीच्या विशेष सभेत २०२६-२७ या वर्षाचे १४५२ कोटी १० लाख रुपयांचे करवाढ नसलेले अंदाजपत्रक सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांना सादर केले होते. या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नात ५२ कोटी ५६ लाख ८६ हजारांची वाढ करून तसेच खर्चातील काही तरतुदींमध्ये बदल करून दुरुस्तीसह १५२५ कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास सोमवारी (३०) रोजी झालेल्या महासभेत सभेत मंजुरी देण्यात आली. यात महापौर दीपमाला काळे यांनी उत्पन्न वाढीसह अन्य दहा मुद्दे सुचविण्यात आले.

जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मागृहात विशेष महासभा महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सुरवातीला महापौरांनी अंदाजपत्रक समाविष्ट करण्यासंदर्भात १० सूचना यावेळी मांडल्या. त्यानंतर स्थायी समिती सभापती डॉ. पाटील यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकावर मनोगत व्यक्त केले. यावेळी अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्तावाला नितीन लढा यांनी अनुमोदन दिले तर सूचक दीपक सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली.

घरकुलांची थकबाकीसाठी धोरण ठरवा

अंदाजपत्रक मंजुरी नंतर सभागृह सदस्य नितीन लड्डा यांनी शहरातील घरकुलांची थकबाकी वाढत आहे. ९० टक्के तेथील मुळ घरकुल धारक तेथे नसून त्यांनी दुसऱ्यांना दिलेल्या असून तेथील रहिवासी पैसे भरण्यास तयार आहे. त्यामुळे तेथील वसुलीसाठी धोरण ठरवून तीन महिन्यात अहवाल महापालिकेने द्यावा असे सांगितले.

महापौरांनी सुचविलेले महत्त्वाचे मुद्दे

  • एन.ए. जागा मंजुरी झाल्यावर महापालिकेला ५० टक्के भरणा होईल.
  • खुला भूखंड कर आकारणी केल्याशिवाय कर वसुली मंजुरी द्यावी
  • रस्त्याच्या बाजूला बांधकामेच वेस्ट मटेरियलवर प्रति ब्रास २ हजार रुपये दंड लावणे
  • श्वान पाळणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यातून उत्पन्न मिळेल.
  • भटके श्वान, प्राणी पाळणे, अन्न पुरविण्यासाठी २ कोटीची तरतूद करावी.
  • भुयारी गटारीची जोडणी न करणाऱ्यांना दीड हजारांचा खर्च मालमत्ता बिलात

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---