खळबळजनक! नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी…!

---Advertisement---

 

अंत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे, नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून यात अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

बिहारमधील नालंदा येथे एक भीषण दुर्घटना घडली असून शीतला देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या शेकडो भक्तांचा जनसागर उसळला होता.

दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडताना अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जीव वाचवण्यासाठी भाविकांमध्ये धावाधाव आणि किंचाळ्या सुरू झाल्या.

या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे मोठ्या धार्मिक स्थळांवरील गर्दी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---