जळगाव : युवासेना-शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षा

---Advertisement---

 

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी युवासेना-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे यंदाही विनामूल्य सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असून, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे.


शहरासह जिल्ह्यातील अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही मोफत सीईटी सराव परीक्षा ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत महावीर क्लासेस, गणेश कॉलनी, जळगाव येथे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.


अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसी या शाखांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्टच्या धर्तीवर सराव परीक्षा होणार असून, परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणीची अंतिम मुदत ३ एप्रिल २०२६ पर्यंत ठेवण्यात आली आहे.


या उपक्रमाचा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया व युवाधिकारी प्रितम शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---