मोठा धमाका! Ola इलेक्ट्रिकची जबरदस्त ऑफर; स्कूटर-बाईक फक्त 49,999 पासून, पेट्रोल वाहनांना टक्कर….!

---Advertisement---

 

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी हलचल निर्माण करत Ola Electric ने आपला नवा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. #EndICEAge या मोहिमेंतर्गत कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकच्या किमतीत मोठी कपात करत त्या अवघ्या 49,999 रुपयांपासून उपलब्ध करून दिल्या आहेत.

या ऑफरमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या लोकप्रिय Ola S1 X 2kWh Gen 3 स्कूटर आणि Roadster X 2.5kWh बाईक आता सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीतच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पारंपरिक पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक पर्याय अधिक परवडणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ओला इलेक्ट्रिकने केवळ किंमतच कमी केलेली नाही, तर ग्राहकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी अनेक आकर्षक सुविधा देखील जाहीर केल्या आहेत. यामध्ये ८ वर्षांची विस्तारित वॉरंटी, सर्व्हिस ट्रस्ट गॅरंटी आणि बायबॅक हमी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वाहनाच्या सर्व्हिसमध्ये विलंब झाल्यास ग्राहकांना मोफत कॅब व्हाउचर देण्याची सुविधा देखील कंपनीने जाहीर केली आहे.

कंपनीचे सीएमडी भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे ही काळाची गरज आहे. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा आणि विश्वास देण्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या ऑफरमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही विशेष ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असल्याने इच्छुक ग्राहकांनी वेळेत निर्णय घेणे आवश्यक आहे.

एकूणच, ओला इलेक्ट्रिकच्या या निर्णयामुळे पेट्रोल वाहनांना थेट स्पर्धा निर्माण झाली असून, भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---