जामनेर मध्ये संतप्त नागरिकांचा गॅस सिलेंडर साठी रास्ता रोको आंदोलन

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात गॅस सिलिंडर वितरणात गंभीर अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी करण्यात आलेल्या नव्या नियमांसोबतच अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


अलीकडेच भारत गॅस कंपनीने सिलिंडर वितरणासाठी नवीन धोरण लागू केले असून, यानुसार गॅस एजन्सींना थेट बुकिंग स्वीकारण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आता ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच गॅस बुकिंग करावी लागते. तसेच सिलिंडर वितरणाच्या वेळी ग्राहकांच्या मोबाईलवर येणारा ओटीपी टाकल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते.


मात्र, या नव्या प्रणालीची पुरेशी माहिती नसल्याने अनेक ग्राहक अडचणीत सापडले आहेत. ओटीपी वेळेवर न मिळणे, ऑनलाईन प्रक्रियेची माहिती नसणे यामुळे गॅस मिळण्यात विलंब होत आहे. परिणामी, अनेक ग्राहक एजन्सी कार्यालयात गर्दी करत असून, कर्मचाऱ्यांशी वादविवादाच्या घटनाही घडत आहेत.


या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये संतप्त नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी करत त्यांनी भुसावळ–छत्रपती संभाजीनगर मार्गावर रिकामे गॅस सिलिंडर ठेवून रास्ता रोको आंदोलन छेडले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.


दरम्यान, ग्रामीण भागात गॅस सिलिंडर मिळण्यासाठी सुमारे ४५ दिवसांचा कालावधी लागत असून, शहरी भागातही २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नव्या नियमांची माहिती वेळेवर न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---