भोंदू खरात प्रकरणाला राजकीय वळण; CDR मुळे खळबळ

---Advertisement---

 

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींशी असलेल्या संभाषणाचे तपशील जाहीर केल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.


दमानिया यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात यांच्याशी १७ वेळा संवाद साधला, तर रुपाली चाकणकर यांनी तब्बल १७७ वेळा कॉल केल्याचे समोर आले आहे. या संभाषणाचा कालावधी ३३,७२७ सेकंद इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रतिभा चाकणकर, पाटील आणि सुनील तटकरे यांचीही नावे चर्चेत आली आहेत.


या सर्व पार्श्वभूमीवर, भोंदू बाबाने राजकीय ओळखीचा गैरफायदा घेत सामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना त्रास दिला का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दमानिया यांनी संबंधित सर्वांची चौकशी करून अटकेची मागणी केली आहे.


दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांचा बचाव करताना सांगितले की, “कोणाची श्रद्धा असू शकते, मात्र श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातोय हे ओळखणे नेहमीच सोपे नसते.”


यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित करत, “उपमुख्यमंत्र्यांचे संभाषणाचे तपशील माध्यमांकडे आहेत, मात्र ते एसआयटीकडे का नाहीत?” असा सवाल करत सरकारवर टीका केली आहे.


सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या प्रकरणात एसआयटीकडून नेमकी कारवाई कधी होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. ठोस कारवाई होत नसल्याने सरकारवर निष्क्रियतेचा आरोपही होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---