---Advertisement---
छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील कंकराळा शिवारात एका विहिरीत वाहन कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला विहिरीत कार पडल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र तपासाअंती ते वाहन पिकअप व्हॅन असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने आणि क्रेनच्या साहाय्याने विहिरीत पडलेले वाहन बाहेर काढण्यात आले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









