शिक्षक त्रस्त,शासन सुस्त! राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा, ऐन परीक्षेच्या काळातही शिक्षकांना बीएलओ च्या कामाची सक्ती

---Advertisement---

 

भुसावळ : राज्यात सर्वत्र फेब्रुवारी, मार्च,एप्रिल हे महिने म्हणजे 10 वी,12 वी, व शालेय वर्गांच्या वार्षिक परीक्षांचा काळ असतो. आणि लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा अत्यंत महत्त्वाचा काळ. 10 वी 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक ते लेखी परीक्षांच्या आयोजनापासून ,पर्यवेक्षक उत्तरपत्रिका तपासणे,मॉडरेटर, इ.कामात शिक्षक गर्क असताना ,मग्रूर अधिकारी शिक्षकांचे रास्त म्हणणेही ऐकून न घेता  त्यांना बी एलओ च्या कामाची सक्तीचं करीत नसून शिक्षकांवर पोलिसात गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

परळी वैजनाथ येथील एका शाळेत अनेक वर्गाना एकाच शिक्षक.तोच शिपाई,तोच अध्यापक आणि तोच मुख्याध्यापक सुद्धा! शाळा झाडून मुलांना शिकविणे,मुख्याध्यापक म्हणून वरिष्ठांकडे दररोज अनेक अहवाल पाठविणे ,असलेल्या सर्व वर्गांच्या परीक्षांचे नियोजन करणे,परीक्षा घेणे,उत्तर पत्रिका तपासून परीक्षेचा निकाल तयार करणे इ कामात संबंधित शिक्षक अक्षरशः भरडून जात असताना  व ही वस्तुस्थिती कळवून देखील त्या शिक्षकाला बी एल ओ ची सक्ती करणे करण्यात येत आहे .

या प्रकारामुळे शाळेला कुलूप लावायचे का? आणि शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे काय? अश्याच अधिकाराची नशा डोक्यात शिरलेल्या अधिकाऱ्यांच्या कथा राज्यातील अनेक जिल्ह्यात घडत असल्याच्या अनेक तक्रारी आहे.

हा तर न्यायालयाचाही अवमान ! शिक्षकांना निवडणुकी संबंधी कामे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 5659/ 2007च्या निर्णयात परिच्छेद 32 मध्ये तत्वतः मान्य करून दिशादर्शक म्हटले आहे की,शिक्षकांना निवडणुकीसंबंधी कामे देणे अपरिहार्यच असेल तर ते फक्त शाळेला सुटी असेल,अध्यापनाचे काम नसेल त्याच वेळी द्यावे.शाळा व अध्यापनाचे काम सुरू असताना देवू नये.अश्याच प्रकारे निर्भयसिंग व इतर विरुद्ध उत्तरप्रदेश शासन दि. 11 ऑगस्ट 2022ला ह्या निर्णयात आणि मुंबई उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आह. राज्य अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर न करता शिक्षकांना शाळा सुरू असताना ही कामे देणे चूक आहे .

ह्या शिवाय RTE म्हणजे बाल्कन मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अ शैक्षणिक कामे करण्यासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.  उप सचिव,महाराष्ट्र राज्य ,यांनी दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय, क्रमांक..संकीर्ण – 2023/ प्र. क्र./ 506/ टी एन टी – 1 , मंत्रालय,मुंबई 32 ह्याचे अवलोकन  करावे. असे पत्रकात दबूत करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---