जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर जवाहर पटेल, डॉ. विलास रेलन यांची बिनविरोध निवड

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील दोन रिक्त जागांवर बँकेच्या मुख्य कार्यालयात जळगाव सहाय्यक निबंधक विशाल ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत जळगाव जिल्ह्यातील मतदार संघातून पटेल जवाहर परबत यांची तर जळगाव जिल्ह्या बाहेरील मतदार संघातुन डॉ. रेलन विलास गोपालदास यांची संचालक मंडळाच्या उर्वरीत कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

जवाहर पटेल हे जळगाव शहरातील प्रतिथयश व्यावसायिक असुन विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. डॉ. विलास रेलन हे धुळे येथील असुन, सेनादल व खाजगी क्षेत्रात वैद्यकीय सेवेनंतर आर्थिक क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. गोपाल दुर्ग फाऊंडेशन धुळे येथे ट्रस्टी आहेत, तसेच कुमार नगर सोशल वेल्फ अर सेंटर धुळे च्या स्कुल कमिटीचे चेअरमन आहेत. ते या माध्यमातुन शाळाबाह्य मुलांच्या विकासासाठी विशेष कार्य करीत आहेत.

यावेळी नवनियुक्त संचालकांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने व सहाय्यक निबंधक विशाल ठाकुर यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल राव, डॉ. अतुल सरोदे, जयंतीलाल सुराणा, हरिश्चंद्र यादव, विवेक पाटील, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, मधुकर पाटील, नितीन झंवर, डॉ. पराग देवरे, डॉ. सौ. आरती हुजुरबाजार, संध्या देशमुख, सुभाष लोहार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनिल अग्रवाल तसेच सुनीत तिजारे उपस्थित होते.

केशवस्मृती समूहाचे प्रमुख डॉ भरत अमळकर व संजयजी बिर्ला यांनी नवनियुक्त संचालक यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---