कन्नड घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळली, चार प्रवासी जखमी

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भडगावहून मुंबईकडे जाणारी कार ही कन्नड घाटातील खोल दरीत कोसळली.

मात्र, सुदैवाने ही कार दरीत पडताना झाडांमध्ये अडकल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघातात वाहनातील दोन महिला आणि दोन पुरुष असे एकूण चार प्रवासी जखमी झाले आहेत.

कन्नड घाटात झालेल्या कारच्या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चाळीसगाव तालुक्यात असलेला कन्नड घाट हा धोकादायक वळणांसाठी ओळखला जात असून, अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे समोर येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---