अमळनेर-पारोळा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’, अपूर्ण कामामुळे शेतकऱ्याचा अपघात, नागरिक संतप्त, तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी

---Advertisement---

 

अमळनेर : अमळनेर-पारोळा मार्गावरील रखडलेल्या रस्ते कामामुळे नागरिक आणि शेतकरी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक म हिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. त्यामुळे तात्काळ हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

पारोळा मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर पाणी मारण्यात आले होते. त्यामुळे हा रस्ता निसरडा झाला होता. दरम्यान, याचवेळी बाजरी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समि तीकडे जात असलेले शेलावे येथील शेतकरी पंढरीनाथ देविदास पाटील यांची दुचाकी या निसरड्या रस्त्यावर अचानक स्लिप होऊन अपघात झाला. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यालाही दुखापत झाली आहे.

सुचना फलक, उपाययोजना नाही

स्थानिकांच्या मते, रस्त्याचे काम सुरू असताना या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना, फलक किंवा सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाणी मारल्यानंतर रस्ता निसरडा होतो, याची पूर्ण जाणीव असूनही संबंधित ठेकेदार व प्रशासनाने निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व वाहनधारकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. काम कधी पूर्ण होणार आणि आमचा जीव कधी सुरक्षित होणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आंदोलनाचा इशारा

तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---