---Advertisement---
वरणगाव ( प्रतिनिधी ) : वरणगाव रस्त्यावरील सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजली जाणारी व सर्व सामान्य जनतेला सोयीचा प्रवासाचे एकमेव साधन असणारी बस सेवा संध्या प्रवाशांच्या गैरसोयीचे कारण ठरत आहे बस स्थानकावर थांबा असलेल्या जागी बस नथांबता भलत्याच ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशाना धावपळ करावी लागत असल्याने नेहमी ये जा करणारे शालेय विद्यार्थी , नोकरदार तसेच प्रवाशी वर्गाकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
पंन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर व याला जोडणारे पंधरा ते वीस खेडे गावातून लांबचा प्रवास करण्याकरीता , शिक्षणाकरीता, तसेच नौकरी निमत्त सोबत शेकडो प्रवाशी येथुन प्रवास करतात मात्र सकाळच्या सुमारास बोदवड वरून येणारी बस नियोजीत बस स्थाब्यावर बस न थांबता परस्पर पुढे निघुन जातात किंवा थांब्याच्या मागेच थांबवता यामुळे दररोज ये जा करणाऱ्याना धावपळ करून बस धरावी लागते कित्येकदा बसला हात दाखवूनही, ठोकून बस थांबविण्याचा प्रयत्न केला जातो पण बस चालक त्याकडे दुर्लक्ष करीत अडमुठे धोरण अवलंबुन बस पुढे घेऊन जातात परिणामी नोकरदार, विद्यार्थ्यी व प्रवाशांना आपल्या नियोजित वेळेत न पोहचता दुसऱ्या बसची तटकाळात वाट पाहत संताप व्यक्त करीत बसतात
लांब पल्याच्या बस शहरा बाहेरूनच
राष्ट्रीय महामार्ग वाहनासाठी खुला होण्या आधी सर्वच बस स्थानकावरून जात होत्या त्या काही ठरविक लांब पाल्याच्या बसला थांबा नव्हता उर्वरीत सर्व बससेवा नियमीत सुरू होती मात्र महामार्ग रहदारीसाठी खुला झाल्या नंतर बऱ्याच लांबपल्याच्या बसा शहराच्या बाहेरून जातात यासाठी एसटी बस व्यवस्थापकांना पत्रव्यवहार करून, आंदोलने करून लांब पल्ल्याच्या बस शहराच्या बस स्थानकाकडे वळविण्याची मागणी केली होती त्याचा काहीच परिणाम झाला नाही
प्रवाशी निवारे व्यवसायीकांसाठी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहराच्या बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने चार प्रवाशी निवारे उभारण्यात आले आहे मात्र त्या निवाऱ्या भोवती किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटून बसले आहे प्रवाशी निवारे आहे की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात असून प्रवाशांना उन्हातान्हात उभे राहवे लागते
वाहतुकीवर नियंत्रण नाहीच
बस स्थानक चौकात अगदी सकाळ पासूनच नागरिकांनसह लहान मोठ्या वाहणानाची नेहमी वर्दळ असल्याने चौका पासून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर व बोदवड रस्त्यावर वाहनाची नेहमी कोंडी होऊन त्यातून बऱ्याचवेळ वाहन धारकांनाचे एकामेका सोबत भांडण होत असतात तर कधी अपघातही होत असतात त्यासाठी बस स्थानक चौकात किमान एक तरी वाहणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस शिपाई असला तर कदाचित वाहतुक कोंडीला आळ बसुन मार्ग मोकळा होण्यास मदत होऊ शकते असे मत नागरिकांन कडून व्यक्त केले जात आहे









