मेहरूण तलाव परिसरात दोन गटाच्या वादातून तुफान हाणामारी; धारदार शस्त्रांनी हल्ला, ३ जण गंभीर जखमी

---Advertisement---

 

जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेला वाद थेट रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, क्रिकेट सामना संपल्यानंतर किरकोळ कारणावरून दोन्ही गट आमने-सामने आले. “तुम्ही कुठले?” या साध्या प्रश्नावरून वादाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला. हाणामारीदरम्यान दोन्ही गटांनी चॉपरसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर जीवघेणे हल्ले केले. या घटनेत राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहित महाजन हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी राहुल सोनवणे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असताना मोहित महाजन याची प्रकृती अचानक खालावली. छातीत दुखू लागल्यानंतर तो बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्या छातीवर चॉपरने वार झाल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी जळगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विक्रांत राणे, मोहित महाजन आणि निलेश सपकाळे यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. आणि जळगावच्या मेहरूण तलाव परिसरात या घटनेनंतर काही काळ तणावपूर्ण झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---