ठाण्यात पहलगामची पुनरावृत्ती ! धर्म विचारून सुरक्षा रक्षकांना भोसकले

---Advertisement---

 

मुंबई : ठाण्यातील मिरा रोड येथे धर्म विचारून दोन सुरक्षा रक्षकांना भोसकल्याची खळबळजनक घटना घटल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने हल्लेखोराच्या घरावर केलेल्या छापेमारीत ‘लोन वुल्फ ॲटॅक’ आणि इसिससंबंधित नोट्स सापडल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

प्राथमिकृष्ट्या ही घटना कट्टरपंथीने केलेला हा ‘लोन वुल्फ ॲटॅक’ असल्याचे दिसून येते. या व्यक्तीने सोमवारी पहाटे सुरक्षारक्षकांवर चाकूने वार करण्यापूर्वी त्यांना कलमा पठण करण्यास सांगितले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. झैब झुबेर अन्सारी असे अटक केलेल्या कट्टवाद्याचे नाव आहे. तो २०२० मध्ये अमेरिकेतून परतला.

आरोपीने दोघांनाही धर्म विचारला आणि कलमा म्हणण्यास सांगितले. त्यांना तसे करता आले नाही, त्यावेळी त्याने चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालो, अशी माहिती पीडितांपैकी एकाने दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग केला.

मिरा रोडमधील घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावरील नयानगरमधील स्मिता रेसिडेन्सी इमारतीत अन्सारी एकटाच राहतो. एटीएसने छापेमारी करीत त्याच्या घराची झडती घेतली असता तिथे ‘लोन वुल्फ ॲटॅक’ आणि इसिसशी संबंधित नोट्स, लॅपटॉप आणि कुराणच्या तीन प्रति सापडल्या.

घटनेपूर्वी त्याने जवळपासच्या मशिदीचा पत्ता सुरक्षा रक्षकांकडे मागितला होता. दोन्ही सुरक्षा रक्षकांनी मशिदीचा पत्ता माहीत नसल्याचे सांगितले. तुम्ही हिंदू आहात का, असा प्रश्न त्याने विचारला आणि समोर निघून गेला. काही क्षणातच अन्सारी पलटला त्याने खिशातून चाकू काढत सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन आणि त्याचा पर्यवेक्षक राजकुमार मिश्रावर हल्ला केला.

कलमा पठण कर

हल्ला करीत असताना अन्सारीने पर्यवेक्षकाला तो हिंदू आहे का, असा प्रश्न विचारला आणि नसल्यास कलमा पठण करावा असे म्हटले. कलमाचे पठण करू न शकल्याने त्याने चाकूने सपासप वार केले. मागील वर्षी पहलगामध्येही दहशतवाद्यांनी पीडितांपैकी एकाला गोळ्या घालून ठार करण्यापूर्वी कलमा पठण करण्यास सांगितला होता.

२० वर्षे अमेरिकेत वास्तव्य

अन्सारीचे २००० पासून २०२० पर्यंत अमेरिकेत वास्तव्य होते. वर्क परमिटची मुदत संपल्यानंतर तो भारतात परतला. त्याचे कुर्ला आणि वाशीत वास्तव्य होते. २०२२ पासून तो २०२२ पासून स्मिता रिजन्सी या इमारतीत एकटाच राहतो. त्याची पत्नी अफगाणची आहे. ती त्याला सोडून अमेरिकेत गेल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---