महासत्तेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन कलाकृती

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला सुमारे १.४ कोटी डॉलर्स किमतीच्या ६५७प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. या कलाकृती तस्करी नेटवर्कद्वारे विदेशात पोहोचवण्यात आल्या होत्या. या तपासानंतर जप्त करून परत करण्यात आल्या.

मॅनहटन डिस्ट्रिक्ट ॲटर्नी एल्विन बॅग यांनी मंगळवारी या कलाकृती परत करण्याची घोषणा केली. या सर्व कलाकृती आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आल्या होत्या. तपासात कुख्यात कला विक्रेता सुभाष कपूर आणि तस्कर नॅन्सी वीनर यांच्याशी संबंधित नेटवर्क समोर आले. या नेटवर्कद्वारे भारत आणि इतर अनेक देशांच्या सांस्कृतिक वारशाची चोरी आणि विक्री केली जात होती. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कौन्सिलर राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत कलाकृती परत करण्यात आल्या. भारताचे महावाणिज्य दूत बिनय प्रधान यांनी अमेरिकन एजन्सींच्या सहकार्याची प्रशंसा केली. परत केलेल्या वस्तूंमध्ये २० लाख डॉलर्स किमतीची ‘अवलोकितेश्वरा’ची कांस्य प्रतिमा आहे. ती छत्तीसगडमधील रायपूर येथील संग्रहालयातून चोरीला गेली होती.

याव्यतिरिक्त, मध्य प्रदेशातील मंदिरातून चोरी झालेली नृत्य करणाऱ्या गणेशाची मूर्ती देखील समावेश आहे. एक लाल वाळूच्या दगडाची बुद्ध प्रतिमा देखील परत करण्यात आली आहे. याची किंमत सुमारे ७५ लाख डॉलर्स आहे. ही प्रतिमा देखील तस्करी करून अमेरिकेत पोहोचवण्यात आली होती. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट ॲटर्नीच्या ॲन्टिक्विटीज ट्रॅफिकिंग युनिटने आतापर्यंत ६२०० हून अधिक सांस्कृतिक वस्तू जप्त केल्या आहेत. यांची एकूण किंमत ४८५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. यापैकी ५९०० हून अधिक वस्तू ३६ देशांना परत करण्यात आल्या आहेत. अजूनही अनेक कलाकृती विदेशात आहेत. यांना परत आणण्यासाठी तपास आणि कारवाई सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---