---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत छेड काढली. तसेच, मुलीच्या कुटुंबियांना धमकी देत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. तसेच, या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









