बिहारमध्ये ३२ मंत्र्यांनी घेतली शपथ; सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार…!

---Advertisement---

 

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ३२ नेत्यांना राज्यपाल ले. सय्यद अता हसनैन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित होते. मंत्रिमंडळात माजी उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, माजी मंत्री श्रवणकुमार आणि अशोक चौधरी यांचाही समावेश आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे १५, जदयूचे १३, एलजेपी रामविलासचे दोन आणि एचएएम व आरएलएमचे प्रत्येकी
एका नेत्याने मंत्री म्हणून शपथ घेतली. जदयूच्या तीन नवीन चेहऱ्यांनी शपथ घेतली. यात माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांतकुमार, बुलो मंडल आणि श्वेता गुप्ता यांचा समावेश आहे.

बिहार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा पुन्हा एकदा नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या मजबूत संघटनात्मक स्थितीमुळे, सभागृहातील आक्रमक शैलीमुळे आणि प्रशासकीय अनुभवामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर सातत्याने विश्वास ठेवला आहे. आमदार ते मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता सम्राट मंत्रिमंडळातील त्यांचे यश, हे बिहारच्या राजकारणातील त्यांच्या मजबूत अस्तित्वाची साक्ष आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---