---Advertisement---
जळगाव : स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर तसेच मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धा कोकिळ गुरुजी अक्वा स्पा जलतरण तलाव येथे उत्साहात संपन्न झाली. दि. १० मे रोजी झालेल्या या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे १५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेस सातपुडा ऑटोमोबाईल्स, मनशांती हॉस्पिटल व ब्रह्मांड हॉल यांचे प्रायोजकत्व लाभले. स्पर्धेचे उद्घाटन मनपा महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण समारंभ जळगाव शहराचे आमदार श्री.राजू मामा भोळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सौ. राजश्री झुंझुनवाला, नगरसेविका सौ. सुचिता हाडा, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदयसिंग पाटील, उपाध्यक्ष ॲड.आर. आर.आबा तसेच सपनभाऊ झुंझुनवाला आदी.मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विविध गटांतील विजेते पुढीलप्रमाणे :
८ वर्षांखालील गट स्पर्श माडगे, कबीर सोनवणे, रिवाश भांडारकर यांनी तर मुलींमध्ये गारंगी जंजाळे, प्रिया बाविस्कर, प्राची उत्तरदे व अविरा पांडव यांनी यश संपादन केले.
१० वर्षांखालील गट: निशांत पंकज देशमुख, पियुष चौधरी, तन्मय घोडेस्वार यांनी तर मुलींमध्ये गौरी बाविस्कर, रितिका सोनवणे व सांनवी मुळे
१२ वर्षांखालील गट: तीर्थ अहिरे, गगन चौधरी, रुषी अग्रवाल व तनुश्री वाडीले
१४ वर्षांखालील गट: अथर्व मोकाशे, द्रव्य चांदीवाल, जयवर्धन पाटील, अनुज घोडेस्वार तसेच मुलींमध्ये वृषाली बडगुजर
१७ वर्षांखालील गट: रोहन अहिरे, ऋषिकेश परदेशी, पार्थ अहिरे तसेच मुलींमध्ये रेवती झोपे, प्रचिता चौधरी व अनुष्का पोतदार
पुरुष गट: शुभम काळे व विमल किर्ती मेढे, महिला गटात तेजस्विनी पाटील
मास्टर्स गट: सुप्रीत मुळे, कमल मणियार व संदीप महाजन यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली.
स्पर्धेसाठी पंच म्हणून कमलेश नगरकर, वैभव सोनवणे, मनोज झोपे, पंकज बाविस्कर, संदीप पाटील, पंकज शिंदे, ज्योत्स्ना पोतदार, डॉ.कांचन विसपुते, सुनिता पांडव,मधुबाला झोपे, मंजुश्री हांडे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.









