चुंचाळे ते किनगाव रस्त्याला काटेरी झुडपांचा विळखा; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…!

---Advertisement---

 

यावल तालुक्यातील चुंचाळे ते किनगाव नायगाव ते किनगाव आणी चुंचाळे ते नायगाव या रस्त्यावर सध्या काटेरी झुडपांनी मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे.यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक व वाहनधारक करत आहेत.

“अपघाताची भीती” या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.वाहनधारकांना अनेक वेळा आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो तसेच समोरुन मोठे वाहन आल्यावर  दुचाकीस्वारांच्या अंगाला ही काटेरी झुडपे लागून जखमा होताना दिसत आहेत, तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे.चुंचाळे ते किनगाव रस्त्याची  झुडपांसोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होते

ग्रामस्थांची मागणी चुचाळेहून जळगाव जाण्यासाठी हे रस्ते महत्त्वाचे दुवा असूनही प्रशासनाला याचे विसर झाला  आहे का? तातडीने या झुडपांची छाटणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते  असे वाहनधारकामध्ये बोलले जात आहे  सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---