जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे ठरले विजेते; १५ हजारांच्या पारितोषिकाने गौरव

---Advertisement---

 

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे ठरले विजेते; १५ हजारांच्या पारितोषिकाने गौरव
जळगाव : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू योगेश धोंगडे यांनी विजेतेपद पटकावले. कांताई सभागृह येथे ९ व १० मे रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील ४५ हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
अंतिम सामन्यात योगेश धोंगडे यांनी रईस शेख यांचा २५-१२, १६-१९, २१-१५ अशा फरकाने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले.


स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत योगेश धोंगडे विरुद्ध अफजल शेख, अयाज शेख विरुद्ध अय्युब खान, नईम अन्सारी विरुद्ध फिरोज खान आणि मुस्तुफा खान विरुद्ध रईस शेख असे सामने रंगले. त्यानंतर उपांत्य फेरीत योगेश धोंगडे विरुद्ध अय्युब खान तसेच रईस शेख विरुद्ध फिरोज खान यांच्यात चुरशीचे सामने झाले. अंतिम फेरीत योगेश धोंगडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले.
यावेळी डॉ. घनश्याम कोचुरे मेडिकल फाऊंडेशनचे पराग कोचुरे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हबीब इंजिनियर, सैयद मोहसीन, आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पराग कोचुरे यांनी जैन स्पोर्ट्स अकॅडमीने कॅरम खेळाडूंना दिलेले व्यासपीठ मोलाचे असल्याचे सांगितले. तर अरविंद देशपांडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अकॅडमी सदैव पुढाकार घेत असल्याचे नमूद केले.


स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अॅड. रेखा कोचुरे, तेजस कोचुरे, मंजूर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचे जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम कोगटा व सरकार्यवाह नितीन बरडे यांनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---