---Advertisement---
जळगाव : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये पवन रविंद्र नाले यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी, तर मुरलीधर लोखंडे यांची भुसावळ तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
पवन नाले आणि मुरलीधर लोखंडे हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण आणि विकासाच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी तसेच पत्रकार बांधवांकडून दोघांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पाणी संवर्धन आणि जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.









