​”तर उद्या सकाळी फाशी घेतो…” मनोज जरांगे पाटील यांचे सरकारला थेट ओपन चॅलेंज!

---Advertisement---

 

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात आज अंतरवाली सराटी येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वादळी बैठक पार पडली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला. तसेच, स्वतःवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सरकारला थेट ‘फाशी’ घेण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे.
​प्रसाद लाड यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे म्हणाले, “राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. मी गेल्या ४ महिन्यांत विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. महामंडळाच्या विषयात परतावे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल ६०० कोटी रुपये थकले आहेत. यामुळे गरीब मराठा मुलांचे सिबिल स्कोअर खराब झाले आहेत. मी केवळ आरोप करायचा म्हणून खोटे आरोप करत नाही, तर पुराव्यांसह बोलत आहे.”


​मुख्यमंत्री आमचे शत्रू नाहीत, पण…

​आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना जरांगे पाटील म्हणाले की, “अनेक लोकांना वाटते की मी केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करतो. पण मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू किंवा दुश्मन नाही. जर ते आमचे शत्रू असते, तर याच मराठा समाजाने त्यांना निवडून दिले असते का? मला तुमच्याशी हे बोलावं लागणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला काय वाईट बोललो का? मग आम्हाला का मारायचं?” असा सवाल त्यांनी लाठीचार्जच्या संदर्भाने उपस्थित केला.


​…तर उद्या सकाळी फाशी घेतो: जरांगेंचे ओपन चॅलेंज
​स्वतःच्या प्रामाणिकतेवर आणि पैशांच्या देवाणघेवाणीच्या आरोपांवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा संताप अनावर झाला. त्यांनी जाहीर आव्हान देत म्हटले, “मी पैशाने, पदाने फुटत नाही. मला कोणी दाखवून द्यावं की मी एक रुपया घेतला, मी उद्या सकाळी फाशी घेतो! सरकारने फक्त एकदा सांगावं की याला १ रुपया दिला, ७०० रुपयांचं काम दिलंय, हे कोणीही सांगावं.” असे थेट ओपन चॅलेंज त्यांनी या बैठकीत दिले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---