जिल्ह्यात प्रथमच ‌‘लाचलुचपत‌’च्या कारवाईत कोटींची अपसंपदा जप्त लाचखोर उपनिबंधकाच्या घरझडतीत ‌‘एसीबी‌’ला आढळली रक्कम

---Advertisement---

 

सहकार विभागातील उपनिबंधकासह अन्य मानद सेवकास 20 मे रोजी एक लाखाहून अधिक रकमेची लाच घेताना अटक झाली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून शुक्रवारी (22 मे) उपनिबंधकाच्या घरझडतीदरम्यान तब्बल एक कोटी सात लाख 44 हजार 75 रुपयांची अपसंपदा जप्तीची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शंभर रुपयांपासून ते सर्वांत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत लाच प्रकरणी अनेक अधिकारी, कर्मचारी व खासगी पंटर यांना अटक करण्यात आली आहे. यात आतापर्यंत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याच्या घरझडतीत वा बॅग झडतीत मोठी रक्कम अपसंपदा आढळून आलेली नाही. परंतु 20 मे रोजी सहकार विभागाच्या निबंधकाने व खासगी मानद कर्मचाऱ्याने अवैध सावकारीचे प्रकरण दडपण्यासाठी तक्रादाराकडून लाखाहून अधिक रकमेची लाच स्वीकारली. याप्रकरणी न्यायालयाकडून संबंधित लाचखोर अधिकाऱ्यास 23 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वांत मोठ्या पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सार्वजनिक बांधकाम अभियंत्याला अटक करण्याचे प्रकरण ताजे असतानाच सहकार विभागातील उपनिबंधक जगदीश बारी या तसेच अन्य मानद सेवकास 20 मे 2026 रोजी एक लाखाहून अधिक रकमेची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्ह्यात प्रथमच लाचलुचपत विभागाकडून 22 मे रोजी उपनिबंधकाच्या घरझडतीदरम्यान कॉसमॉस बॅकेच्या लॉकरमध्ये 99 लाख 4 हजार 960 रुपयांचे सोने, हार-बांगड्या, बिस्किटे, 10.500 ग्रॅम चांदीचे 2625 रुपयांचे दागिने, 8 लाख 36 हजार 500 रुपये रोख अशी तब्बल एक कोटी सात लाख 44 हजार 75 रुपयांची अपसंपदा जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलिस हवालदार संगीता पवार, पोलिस अंमलदार प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी, चंद्रशेखर चौधरी यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---