रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत; खतांच्या किंमती कमी कराव्यात शेतकऱ्यांची मागणी…!

---Advertisement---

 

खरीप हंगाम तोंडावर आला असताना रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता खतांच्या दरवाढीमुळे आणखी वाढली आहे. कासोदा परिसरातील शेतकरी बांधवांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून खतांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी केली आहे.

भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दिवसरात्र मेहनत करूनही शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांचे नियोजन करताना उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

सध्या बाजारात बियाणे, डिझेल आणि रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
२०:२०:० खताची बॅग सुमारे १८०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे,
तर अमोनियम सल्फेटसाठी १४०० रुपये मोजावे लागत आहेत.,
याशिवाय १०:२६:२६ खत २१०० रुपये,
१६:१६:१६ खत २०५० रुपये,
१५:१५:१५ खत २०२५ रुपये,
आणि २०:२०:१३ खत २००० रुपयांपर्यंत विकले जात आहे.
प्रत्येक खताच्या बॅगेमागे सुमारे ३०० रुपयांची वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खतांच्या वाढत्या दरामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेती कशी परवडणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करून रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---