चोपडा, अमळनेर, धरणगाव व पारोळा तालुक्यात विशेष मोहीम; 7,410 लिटर रसायन नष्ट, 20 गुन्हे दाखल; 15 आरोपी ताब्यात…!

---Advertisement---

 

अमळनेर : पुणे येथे गावठी दारू प्रकरणामुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा विभागात विशेष मोहीम राबवत अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाई केली. दि. 1 जून ते 4 जून 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण 20 गुन्हे नोंदविण्यात आले असून 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जळगाव व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा, अमळनेर, धरणगाव व पारोळा तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान आरोपींकडून 7 हजार 410 लिटर रसायन, 200 लिटर गावठी दारू, 200 लिटर ताडी तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 5 लाख 60 हजार 795 रुपये इतकी असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

चिखलोद शिवार, शेळावे शिवार, गांधली, कलाली, सावखेडा, हिंगोली बुद्रुक, सुटकार व अडावद परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत निरीक्षक अ. कै. सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, एन. पी. खपके, आर. के. फुसे तसेच डी. एन. पाटील, एस. एस. पाटील, भूषण परदेशी व नितीन पाटील यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, हातभट्टी, वाहतूक व विक्रीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---